देशात सर्वात जास्त स्वस्त टेलिकॉम सेवा आणि रिचार्ज देणाऱ्या सरकारी दूरसंचार कंपनी भारत दूरसंचार निगम (BSNL) कडून आणखी स्वस्त रिचार्ज प्लान दर कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.विशेष म्हणजे BSNL द्वारे पुढील वर्षी अख्या देशात 4G network विस्तार करून 5G सेवा सुरू होणार आहे.या सरकारी टेलिकॉम कंपनीच्या धडाकेबाज निर्णयांमुळे BSNL SIM आणि ब्रॉडबँड सेवा घेणाऱ्या ग्राहकांची चांदी होत आहे,तर दुसरीकडे खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे यामुळे दणाणले आहे.
लवकरच BSNL ची 5G सेवा सुरू होणार असल्याने BSNL SIM युजर्स ची संख्या झपाट्याने वाढत आहे.याचे प्रमुख कारण म्हणजे खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे महागडे रिचार्ज प्लान, टेरिफ आणि महाग ब्रॉडबँड,वायफाय सेवा सर्वसामान्य ग्राहकांना परडवणारे नाही.त्यामुळे मागील काही महिन्यातच मोठ्या प्रमाणात BSNL युजर्स वाढलेले आहेत.
खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी गमविले 1 कोटी 8 लाख युजर्स.
भारतात सर्वात स्वस्त मोबाइल सेवा देणारी सरकारी कंपनी बीएसएनएल कंपनीच्या स्वस्त प्लॅन्स आणि 4G सेवेमुळे ग्राहकांच्या Bsnl सेवा घेण्याकडे कल वाढल्याने खासगी टेलिकॉम कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हा त्यांच्या ग्राहकांच्या रुपात झालं आहे.अलीकडच्या काळात JIO,AIRTEL, IDEA आणि vodafone या खाजगी कंपन्यांनी तब्बल 1 कोटी 8 लाख ग्राहक गमाविले आहे.
उल्लेखनीय म्हणजे सप्टेंबर 2024 पर्यंत देशभरात 1 कोटी 33 लाख विविध खाजगी कंपन्यांचे सिम युजर्सकडून आपले सिम बीएसएनएल मध्ये पोर्ट करण्यासाठी अर्ज केले होते यापैकी मोठ्या संख्येत ग्राहक आतापर्यंत बीएसएनएल कडे वळलेले आहेत. ग्राहकांचा हा मोठा आकडा बीएसएनएल कडे वळण्यात या सरकारी कंपनीचे स्वस्त रिचार्ज प्लान आणि ब्रॉडबँड,वाय-फाय सेवा महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
BSNL 5G नेटवर्क आणि ग्राहक सेवा स्पर्धेत मुसंडी,तर खाजगी Telecom कंपनींच्या मोठा नुकसान.
महाग टेलिकॉम सेवा आणि रिचार्ज प्लॅन्स मुळे या कंपन्यांचे SIM युजर्सनी BSNL कडे पोर्ट केले आहे.मात्र आता युजर्सचा डेमेज कंट्रोलसाठी एअरटेल, जिओ, व्होडाफोन आयडिया हे कंपन्या आपले मोबाईल सेवा दर कमी करू शकतात,पण BSNL स्पर्धेत टिकून राहिली आणि 5G सेवा सुरळीत देण्यात यशस्वी ठरली तर खाजगी कंपन्यांना भविष्यात मोठा नुकसान होऊ शकतो.
असे टेलिकॉम क्षेत्रातील विशेषज्ञ मानत आहे. या संदर्भात भारतीय दूरसंचार नियमित प्राधिकरण (TRAI) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मागील तीमाही मध्ये व्होडाफोन, आयडिया, एअरटेल आणि जिओ चे युजर्स घटलेले आहेत. या खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज प्लान बीएसएनएलच्या महाग असल्याने लोकांचा कल या शासकीय टेलिकॉम कंपनीची सेवा घेण्याकडे वाढला आहे. तरीही बीएसएनएल मध्ये सिम पोर्ट करणाऱ्या ग्राहकांची संख्या सध्या कमी आहे.
दर वाढणार नाहीत.
सध्या बीएसएनएल ची दूरसंचार सेवा सर्वात स्वस्त आहे सोबतच ही सरकारी टेलिकाम कंपनी भविष्यात दरवाढ करण्याचा कोणताही विचार करीत नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. सध्या बीएसएनएलचे सेवा दर कमी आणि खाजगी कंपन्यांचे अधिक आहेत. स्वस्त रिचार्ज मिळत असल्याने बीएसएनएल कडे ग्राहकांचा ओढा जर वाढला तर बीएसएनएल सोबत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी खाजगी कंपन्यांना सुलट आपले रिचार्ज स्वस्त करण्याची पाळी येणार असल्याचे टेलिकॉम क्षेत्रातील विशेषज्ञ मानत आहे.
BSNL चे 5G सेवेसाठी चाचण्या सुरू.
येत्या मार्च 2024 पर्यंत बीएसएनएल संपूर्ण देशभरात ग्रामीण आणि शहरी भागात 4G सेवा विस्तार करीत आहेत यासाठी देशभरात दहा लाख नवीन टॉवर्स उभारण्याचे काम पूर्णत्वावर आले आहे याच दरम्यान बीएसएनएल कडून 5G नेटवर्क सेवा देण्यासाठी तयारी करण्यात येत आहे यासाठी चाचण्या सुरू झाले आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मते आधी 4G नेटवर्क ठेवा मजबूत करण्यासोबतच भविष्यात बीएसएनएल टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धेत टिकून राहावे यासाठी आधुनिक आणि उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे.
4G नेटवर्क आणि दूरसंचार सुविधा तसेच इंटरनेटचा चांगला यामुळे मिळणार आहे. स्वस्त आणि सुविधाजनक सेवा देण्यामुळे मागील सप्टेंबर या एक महिन्यातच देशभरात 8लाख 49 हजार युजर्स वाढलेले आहे. त्यामुळे आता बीएसएनएलचा टेलिफोन क्षेत्रातील हिस्सा 7.98% झालेला आहे भविष्यात तो यापेक्षा जास्त वाढणार अशी अपेक्षा बीएसएनएल व्यवस्थापन,सरकार आणि दूरसंचार मंत्रालय मानत आहे.