Aadhr Card Link मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे’ पैसे महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अजूनही काही महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत. अनेक जणींचं आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक केलेलं नाही. यामुळे योजनेचे पैसे येण्यास अडचण येत आहे. आता तुम्ही घरबसल्या देखील आधार कार्ड बँकेला लिंक करू शकता, ते कसं हे खाली सविस्तर दिलं आहे. Aadhr Card Link
आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही, कसं ओळखणार?
सर्वात अगोदर गुगलवर जाऊन my aadhar असे सर्च करावे.
त्यानंतर माय आधारच्या वेसबाईटवर क्लिक करून आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा भरून लॉगिन करावे.
त्यानंतर लॉग इन विथ ओटीपी क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तोही तिथे टाकावा.
ओटीपी टाकल्यावर लॉग-इन करा. तुम्हाला समोर आधार कार्डची होम-स्क्रीन दिसेल.
खाली स्क्रोल केल्यावर Bank seeding status हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करावे.
येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, बँकेचे नाव, आणि तुमचं Bank seeding status हे ॲक्टिव्ह आहे की नाही ते दिसेल.
आधार कार्ड लिंक नसेल तर ते स्टेटस inactive असं दिसतं.Aadhr Card Link
आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक कसं करणार?
सर्वात अगोदर गुगलवर जाऊन NPCI (National Payment Corporation of India) असं सर्च करा.
पुढे तुम्हाला npci.org.in ही अधिकृत वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा.
होमस्क्रीनवर खाली स्क्रोल केल्यानंतर consumer हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करावे.
येथे तुम्हाला Bharat Aadhar seeding हा पर्याय दिसेल , तेथे enable वर क्लिक करावे.
नंतर एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. नंतर आधार नंबर लिंक करायचा असेल तर त्यासाठी request for Aadhar ला seeding या पर्यायावर क्लिक करावे. Aadhr Card Link
खाली तुमच्या कोणत्या बँकेचं अकाऊंट लिकं करायचं आहे, त्या बँकेचे नाव निवडा आणि fresh seeding ( नव्याने लिंक करण्याचा पर्याय) यावर क्लिक करा.
पुढे बँकेचा अकाऊंट नंबर टाका.
अकाऊंट नंबर कन्फर्म केल्यावर खाली काही टर्म्स आणि कंडीशन्स दिसतील, त्या पूर्ण वाचा आणि स्वीकारा. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा भरून proceed बटणावर क्लिक करावे.Aadhr Card Link
खाली पुन्हा तुम्हाला टर्म्स अँड कंडीशन्स दिसतील. तिथे Agree and Continue करावे.
यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल, तो ओटीपी टाका. अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाऊंटसोबत लिंक करू शकता. Aadhr Card Link